• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 4 फेब्रुवारी देण्यात येणाऱ्या स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी जगदीश शिंदे, नरसिंह सूर्यवंशी व प्रा बिभीषण चाटे यांची निवड

◼️मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 4 फेब्रुवारी देण्यात येणाऱ्या स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी जगदीश शिंदे, नरसिंह सूर्यवंशी व प्रा बिभीषण चाटे यांची निवड

◼️जेष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणार

अंबाजोगाई(प्रतिनिधी)

मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर्पण दिन व मूकनायक दिना निमित्य देण्यात येणाऱ्या स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी नरसिंह सूर्यवंशी, स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी जगदीश शिंदे, स्व. दत्ता आबा शिंदे आपेगावकर यांच्या स्मृती निमित्य घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारा साठी प्रा बिभीषण चाटे यांची निवड करण्यात आली असुन 4 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य व व्याख्याते मा संकेत कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात जेष्ठ पत्रकार अंबाजोगाईचे भूमीपुत्र जगदीश पिंगळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्या मार्गदर्शना खाली मागील 4 वर्षा पासुन परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे उल्लेखनीय काम सुरू असुन या वर्षी 4 फेब्रुवारी रोजी दर्पण दिन व मूकनायक दिन संयुक्त रित्या साजरा करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले असुन या कार्यक्रमाचे औचित्य साधुन देण्यात येेनाऱ्या विविध स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यातील पत्रकारा कडुन प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. बीड जिल्ह्यातील पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे या साठी निवड समितीने स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी घाटनांदूर येथील दै लोकमतचे नरसिंह सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असुन त्यांनी लिहलेल्या ” घाटनांदूर रेल्वे शोभेलाच, असुन अडचण नसुन खोळंबा” या वृत्ताला हा पुरस्कार देण्यात येत आहे.

स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी परळी वैजनाथ येथील दै. आदर्श गावकरीचे जगदीश शिंदे यांची निवड करण्यात आली असुन त्यांनी लिहलेल्या “तांडा वस्तीवरच्या शाळांना आणतात बंदी, गरिबांच्या लेकरांना कशी मिळणार संधी” या वृत्ताला हा पुरस्कार देण्यात येत आहे.

तर बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले स्व. दत्ता आबा शिंदे आपेगावकर यांच्या स्मृती निमित्य घोषित करण्यात आलेल्या पत्रकारिता पुरस्कारा साठी पाटोदा येथील दै बीड संकेतचे प्रा बीबीशन चाटे यांची निवड करण्यात आली असुन त्यांनी लिहलेल्या “तो तरुण मनोरुग्ण चार वर्षा नंतरही मृत्यूला नामोहरण करतोय” या वृत्तासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे.

या पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह व रोख रक्कम रु 1001/- असे आसुन हा पुरस्कार वितरण सोहळा 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता स्व. विलासराव देशमुख सांकृतिक सभागृह नगर परिषद येथे महाराष्ट्र शासनाच्या गड किल्ले संरक्षण समितीचे सदस्य व व्याख्याते मा संकेत कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख, केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.

या प्रसंगी जेष्ठ पत्रकार अमर काका हबीब, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, भाजप नेते रमेशराव आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर पापा मोदी, पृथ्वीराज साठे, अ भा काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, अप्पर पोलीस आधीक्षक कविता नेरकर, सा बा चें कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, स्वा रा तीचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, व्यंकटेश्वरा शुगर इंडस्ट्रीयल प्रा लि आंबा साखरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आसुन या सोहळ्यात जेष्ठ पत्रकार ज्यांनी की सतत 40 वर्ष दै लोकमत या दैनिकात उपसंपादक पदावर कार्यरत राहून आपल्या लिखाणातून वंचित, पीडिताना न्याय देऊन सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम तर केलेले अंबाजोगाईचे भूमिपुत्र जगदीश पिंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष गजानन मुडेगावकर व सचिव विरेंद्र गुप्ता यांनी दिली आहे.