• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उद्धव ठाकरे उद्या एमआयएमशीही युती करू शकतात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीवर जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही. आमच्याकडेही भीमशक्ती आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांचा काहीच भरवसा नाही. ते उद्या एमआयएमशीही युती करतील, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे

महाराष्ट्रात महाविकास आघाडी पक्षासोबत कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपचं काहीही करू शकत नाही. काल शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पण बाळासाहेब आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही. आमच्याकडे सुध्दा भीमशक्ती आहे. त्यामुळं आम्ही 51 टक्याची तयारी केली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

कितीही पक्ष एकत्र आले तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे दोन सरदार महाराष्ट्राला मिळाले आहेत. तेच पुरुन उरतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.