• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गोवा येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव पुरस्कार 2023 ने संपादक बालासाहेब फड सन्मानित

परळी, (प्रतिनिधी):-

इंटरनॅशनल ह्यूमन राईट आणि क्राईम कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने अद्भुत भारत, संपन्न भारत, आत्मनिर्भर भारत आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव अवार्ड 2023 ने दैनिक सोमेश्वर साथीचे मुख्य संपादक बालासाहेब फड यांना गोवा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले आहे. संपादक बालासाहेब फड यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी गोवा येथे इंटरनॅशनल हॉटेल पार्क रेगिस्ट येथे इंटरनॅशनल ह्यूमन राईट क्राईम कौन्सिलचे मुख्य डॉ व्ही.पी सिंग व आकांक्षा विद्यार्थी, डॉ हरीश मखीजा यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव अवॉर्ड ने बालासाहेब फड यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे, तसेच या अगोदरही संपादक बालासाहेब फड यांना नाशिक येथे झालेल्या वंजारी समाज साहित्य संमेलनात मानाचा ग्रामीण साहित्यिका कै. सुंदराबाई आंधळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.