• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाला विसरू नये – रानबा गायकवाड

विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाला विसरू नये – रानबा गायकवाड

सोनपेठ:

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाला विसरू नये कारण त्यांच्यामुळेच आपण आहोत याचे भान ठेवावे. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले ते सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी बोलत होते.
शहरातील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने दि.13 जानेवारी, शुक्रवार रोजी ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक किरण स्वामी तर प्रमुख मार्गदर्शक लेखक,कवी तथा संपादक रानबा गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विकास वाघमारे व प्रा.डाॕ.संतोष रंणखाब हे होते.
याप्रसंगी लेखक,कवी तथा संपादक रानबा गायकवाड यांचा परीचय प्रा.सखाराम कदम यांनी करून दिला. यावेळी “कुत्र्यांची अंडी” या नव्या प्रकाशीत कथासंग्रहाबात रानबा गायकवाड यांनी बोलताना आपल्या याविषयी माहिती दिली. तसेच प्रा.सखाराम कदम यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींना हा कथा संग्रह वाचुन दाखवावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाला विसरू नये, आपल्या मधील योग्य गुण ओळखून धेयप्राप्ती साठी प्रयत्न करत रहावे व वडीलांना त्यांच्या व्यवसायात आपणास काय मदत करता येते तेवढी मदत न सांगता करावी. त्याची लाज बाळगण्याचे कारण नाही. कारण त्यांनी त्या कष्टातूनच आपले शिक्षण तसेच सर्व बालहट्ट त्यांनी पुरवलेले आहेत. हे विसरता कामा नये. असे अनेक उदाहरणे देत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम कदम यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रा.डाॕ.संतोष रंणखाब यांनी मानले.