• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी विज्ञान प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे-प्रफुल्ल भदाणे

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी विज्ञान प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे-प्रफुल्ल भदाणे

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व गटशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान व गणित प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न

सविस्तर वृत्त : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व गटशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आले. ही बाब अत्यंत अभिनंदनीय आहे

या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना नक्कीच वाव मिळणार असून अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरावर भरवणे यासाठी प्रचंड कष्ठ मेहनत घ्यावी लागते.योग्य नियोजन करावे लागते. परळी येथे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन भरवल्यामुळे आयोजकांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. असे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांनी 50 व्या विज्ञान गणित प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी केले.

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे 50 सावे विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, गटशिक्षण अधिकारी नवनाथ सोनवणे, शिक्षण विस्तारअधिकारी हिना अन्सारी डॉ. विजय रांदड, मुख्याध्यापक विठ्ठल तुपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या विज्ञान व गणित प्रदर्शना विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देत घरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून जलपुनर्भरण, सुरळीत ट्राफिक कंट्रोल, मानवी उत्सर्जन संस्था, हवेच्या दाबावरील प्रयोग, भूकंप रोधक, आनंददायी गणिताच्या प्रतिकृती असे अनेक साहित्य शिक्षकांच्या ऑनलाइन मार्गशनाखाली कल्पकतेने बनविले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना स्व-निर्मितीचा आनंद लुटता आला. तसेच वैज्ञानिक संकल्पना समजण्यास सोपे झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात सुमारे 100 पेक्षा जास्त विज्ञान प्रकल्पांची मांडणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी प्रदर्शनाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली. या प्रदर्शनात परळी तालुक्यातील 130 शाळांनी सहभाग नोंदवला होता तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग या प्रदर्शनात दाखवले. यावेळी विद्यार्थ्यांना परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. हे प्रदर्शन दिनांक 12 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत चालणार असून यात परळी तालुक्यातील 130 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अनेक वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग सादर केले आहेत. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषा किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.