• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप.

ByND NEWS INIDIA

Jan 11, 2023

 

: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप.

हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तेव्हापासून हसन मुश्रीफ यांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे. या तपासात आता ईडीच्या हाती कोणती कागदपत्रे आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तेव्हापासून हसन मुश्रीफ यांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे. या तपासात आता ईडीच्या हाती कोणती कागदपत्रे आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे नाव आहे. याशिवाय, ते शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आजच्या धाडसत्रानंतर ईडीने हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची कारवाई केल्यास तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धक्का ठरेल. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासह त्यांच्या कार्यालयांचीही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. हडपसर मधील अॅमनोरा आणि कोंढव्यात इडीची छापेमारी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून १५८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यामध्ये हसन मुश्रीफ यांचा जावई आणि मुलगा सहभागी असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते.
नेमकं प्रकरण काय?

किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. २०२० साली कोणत्याही पद्धतीने पारदर्शक व्यवहार न होता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही या कंपनीला कंत्राट का दिले? हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. आजच्या कारवाईनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी पुन्हा संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी म्हटले की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटी रुपयांचे कंत्राट त्यांच्या जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी याचे पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. २०१९ मध्ये धाडी पडल्या होत्या. मंत्री असताना मुश्रीफ यांनी आणखी अफरातफर केली.