• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

इंदुरीकर महाराज यांच्या सासू शशिकला पवार सरपंचपदी: अपक्ष असूनही आल्या निवडून

इंदुरीकर महाराज यांच्या सासू शशिकला पवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. शशिकला पवार म्हणाल्या, मी एक सर्वसामान्य स्त्री आहे. मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला. भरगोस मतांनी मला निवडून दिलं. आम्ही शेती करणारी माणसं. राजकारण हा आमचा विषय नाही. पण, जनतेची सेवा व्हावी म्हणून अपक्ष असतानासुद्धा मतदान मिळालं. शशिकला पवार यांनी सांगितलं की, आम्हाला दोन्ही नेते सारखेचं आहेत. त्यांनी आम्हाला मदत केली. दोन्ही नेत्यांची मदत आम्हाला पाहिजेच. नेहमीच्या राजकारण्यांनी आम्हाला साथ दिली नाही. कष्ट करणारे लोकं माझ्याबरोबर असल्याचंही शशिकला पवार यांनी सांगितलं.
बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील हे या जिल्हयातील नेते आहेत. गावाच्या विकासासाठी आम्ही विखे पाटलांकडं जाऊ शकतो. कारण गावाचा विकास महत्त्वाचा असल्याचं पवार यांनी सांगितलं. शशिकला पवार म्हणाल्या, मी कीर्तनही करते. माझ्या चार वाऱ्या असतात. पंढरपूर, आळंदी, पैठण आणि त्र्यंबकेश्वर. या चारही वाऱ्यांत दोघेही नवरा-बायको पायी असतो. सर्वसामान्य जनतेत आम्ही पायी वारी करतो. आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत. पांडुरंगाची लेकरं आहोत.