• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समितीच्या दणक्याने प्रशासन झाले जागे !

◆सात दिवसात चौकशी अहवाल दाखल करण्याचे मुख्य अभियंताचे आदेश

◆अधीक्षक अभियंता यांची निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत भूमिका काय?

◆शाखा अभियंता देशपांडे व उप अभियंता देवकर यांची हकालपट्टी होणार ?

लातुर प्रतिनिधी :

लातूर जिल्ह्यातील बी.आर.आंदे कॉन्स्ट्रॅक्शन या कंपनी मार्फत झालेले व चालू असलेले रोड काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने औरंगाबाद विभाग गुण नियंत्रण पथकामार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे दि.19/12/2022 पासून बेमुदत आमरण उपोषणास बसले असता उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्य अभियंता श्री.ब.शी.पांढरे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड यांनी उपोषणातील मागण्याची दखल घेऊन लेखी पत्र दिले त्या पत्रामध्ये अधीक्षक अभियंता मंडळ लातूर यांना आदेशित केले की इतर दोन उप अभियंता व कार्यकारी अभियंता यांची समिती तात्काळ स्थापन करून वरील कामाची वस्तुनिष्ठ चौकशी करावी व तसा अहवाल संबंधितास पाठवावा व त्याची एक प्रत प्रादेशिक कार्यालयास सात दिवसांत सादर करावे अन्यथा आपला अहवाल नमूद कालावधीत प्राप्त न झाल्यास दक्षता व गुण नियंत्रण मंडळ औरंगाबाद यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल असे लेखी पत्र उपोषणा स्थळी येऊन सहाय्यक अभियंता श्रेणी एक श्री.एन.आर. वाघमोडे यांनी दिल्याने उपोषणातून माघार घेण्यात आले.
उपोषणातील मागण्या
1) उदगीर येथील शिवाजी चौक ते तोंडारपाटी सिमेंट रोड कामाची चौकशी व्हावी.
2) शिरूर ताजबंद ते वायगाव पाटीच्या रोड कामाची चौकशी व्हावी.
3) घोणसी ते आतनूर डांबरीकरण रोड कामाची चौकशी व्हावी.
4) बी.आर.आंदे कॉन्ट्रक्शन चा परवाना रद्द करून काळया यादीत टाकावे.
5) नेहमी वादग्रस्त असणारे उपविभागीय अभियंता लक्ष्मण देवकर उदगीर यांची तात्काळ हकालपट्टी करावी.
6) शाखा अभियंता देशपांडे जळकोट यांना तात्काळ निलंबित करावे.
7) चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाचे बिल (देयेक) रोखण्यात यावे.
अशी मागण्या घेऊन उपोषणात संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी व शेख अजीम हे बेमुद्दत आमरण उपोषणाला बसले होते दोन दिवसाच्या उपोषणानंतर मागण्या मान्य झाले.
या उपोषणास राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अरुण निटुरे व प्रदेश कार्यकारिणीचे विकास बनसोडे लातूर यांनी उपोषणा स्थळी स्वतः भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला व नांदेड जिल्ह्यातील सविता चप्पलवार, प्रियंका मुद्दामवार, ज्योती वलनंदे, निसार अहेमद, शेख अब्दुल वहाब, मोहम्मद शकील, कासिम जमीनदार, तानाजी भंडे, शेख जुल्फिकार, संजय मुद्दामवार, शेषराव पाटील शेख सैलानी इतर अनेक पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शवीला आहे.