• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार निम्म्या किमतीत ट्रॅक्टर .

ByND NEWS INIDIA

Nov 16, 2022

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार निम्म्या किमतीत ट्रॅक्टर
Tractor Subsidy: केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शासनाकडून शेतकऱ्यांना उत्पन्ननात वाढ व्हावी या अनुषंगाने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा या अनुषंगाने देखील शासनाकडून अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांना शेतीसाठी ‘एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक’ या योजनेंतर्गत सर्व योजना राबवल्या जातात. याच अंतर्गत शेती अवजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेती अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते. आता याच योजनेंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

अनुदान किती ?

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि औजारांसाठी 50 टक्के आणि 40 टक्के अनुदान दिले जाते. ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते.

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबविण्यात येतात. शेतकरी या पोर्टलवर कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळवू शकतात आणि अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. ज्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाते. तुम्ही ट्रॅक्टर आणि अवजारांसाठी अर्ज करू शकता.

पात्रता आणि अटी काय आहेत ?

• एक शेतकरी फक्त एक ट्रॅक्टर घेऊ शकतो.
• म्हणजे राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान केवळ एका साधनासाठी दिले जाते. उदाहरणार्थ (ट्रॅक्टर इम्प्लिमेंट्स / मशिनरी)
• आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
• लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे ट्रॅक्टर असल्यास लाभार्थी ट्रॅक्टर चल उपकरणासाठी पात्र मानला जाईल.
• पण त्यासाठी ट्रॅक्टरचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
• जर एखाद्या लाभार्थ्याने एखाद्या इन्स्ट्रुमेंटसाठी लाभ घेतला असेल परंतु तो त्याच इन्स्ट्रुमेंटसाठी किमान 10 वर्षे अर्ज करू शकत नसला तरी दुसऱ्या साधनासाठीअर्ज करू शकतो.
• जर एखाद्या शेतकऱ्याने यापूर्वी कोणतेही कृषी अनुदान घेतले असेल तर तो ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.