• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जननायक बिरसा मुंडा हे नेमबाजीत बालपणीच तरबेज होते-दीपक तांदळे

ByND NEWS INIDIA

Nov 15, 2022

जननायक बिरसा मुंडा हे नेमबाजीत बालपनीच तरबेज होते-दीपक तांदळे

परळी ( प्रतिनिधी)- संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे तसेच अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.दरम्यान, जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे यावेळी म्हणाले की,बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील ‘उलीहातू’ या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते पहिलेच अपत्य होते. त्यामुळे मुंडा जमातीच्या प्रथा परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले.त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात गेले.त्यांचे वडील गुराखीचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे. बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.