• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पहा कसा केला आगळावेगळा जन्मदिवस साजरा

ByND NEWS INIDIA

Nov 4, 2022

गौशाळेतील जन्मदिन साजरा समाजासाठी प्रेरणादायी…..

परळीतील रेडिमेड कपडे व शाळा गणवेश व्यापारातील सुप्रसिद्ध नाव म्हणजे’भाग्यश्री ड्रेसेस,या दुकानाचे प्रतिष्ठीत मालक श्री. नंदकुमारजी खानापुरे यांच्या जन्मदिनाचे आयोजन परळी ते अंबाजोगाई रोडवरील रामरक्षा गोशाळेत करण्यात आले होते. या ठिकाणी गोपूजन , गो घास ,चारा ,पेंड गुळ, तसेच पारंपरिक पद्धतीने पूजन व आरती आयोजित कार्यक्रमात स्नेही मित्र व तेथील कर्मचारी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात परळीतील प्रतिष्ठित किराणा व्यापारी, सामाजिक व सांस्कृतिक, धार्मिक विविध उपक्रम राबविण्यात सुप्रसिद्ध असणारे श्री.रमाकांत निर्मळजी यांनी सहभाग घेऊन नंदूभाऊंचे काम नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी असते ,असे गौरवास्पद संबोधित उद्गार केले.

उपस्थित सर्वच जणांनी गोमातेचे ,वासराचे पूजन, वस्त्र,साडि चोळी,गो घास,दाळगुळ, पेंड व आरती करून नमन केले .तसेच वंदे मातरम, वंदे गोमाताच्या नावाचा जयघोषा केला.सोबतच नंदू भाऊ यांना टाळ्या वाजवून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या जन्मदिनाची संकल्पना स्वतः नंदू भाऊ यांनीच दीपावली दरम्यान वसुबारसच्या वेळी केली होती. आणि त्याच पद्धतीने आज तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिंदू संस्कृतीमध्ये आईनंतर गोमातेला श्रेष्ठ दर्जा दिलेला असल्याने जगभरामध्ये गाईंना माता म्हणत असल्यामुळे तिचे पूजन करून जन्मदिन साजरा करण्याचा त्यांचा मनोदय सर्व मित्र कंपनी स्नेही नातेवाईक यांनी आज यशस्वी पार पाडला यावेळी उपस्थित सर्वांनी एका वेगळ्या आनंदाचा अनुभव घेतला. समाजामध्ये वाढदिवस कोणत्या पद्धतीने साजरा होत आहे याचे विचारमंथन होण्याचे गरज असल्याचे बोलून केक संस्कृती ही पाश्चिमात्य संस्कृती असून आपल्या येथे औक्षण करणे व घरातील सर्वांनी एकमेकांनी कौटुंबिक पद्धतीने जन्मदिन साजरा करण्यात यावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मनोगत नंदूभाऊ खानापुरे यांनी व्यक्त केले.
हरिप्रसाद मोदाणी, सोमनाथ वळसे, सुनील फुलारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.या वेळी उपस्थित रमाकांतजी निर्मळे ,महालिंग आप्पा हालगे , व्यंकटराव महाजन, सेवानिवृत बॅक मॅनेजर जोशी साहेब इतर सर्वजणांचे व गौशाळा संचालक रतन कोठारीजी यांचे आभार सुनील फुलारी यांनी मानले.