• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

वाहतूक निरीक्षक कपिल चिंडालिया यांचा सत्कार संपन्न

ByND NEWS INIDIA

Oct 30, 2022

वाहतूक निरीक्षक कपिल चिंडालिया यांचा सत्कार संपन्न

नितीन ढाकणे | परळी प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परळी वैजनाथ आगारातील वाहतूक निरीक्षक कपिल चिंडालिया यांचा सत्कार सिने-नाटय-साहित्य-परिवहन-पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.उत्कृष्ट अभिनेता, परळी सिने-नाटय कलावंत संघटनेतील हरहुन्नरी कलावंत,रानबा गायकवाड लिखित आणि डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ‘माईंड ईट’ व ‘फायनल तिकीट’ लघुपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारे नायक,रंगकर्मी प्रदिप भोकरे यांच्या तालमीत घडलेले अस्सल कलावंत म्हणून कपिल चिंडालिया सर्वपरिचित आहेत.
वाहतूक निरीक्षक कपिल चिंडालिया यांची नियुक्ती परळी वैजनाथ आगारात झाल्याबद्दल प्रसिद्ध सिने-नाटय अभिनेता-दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे, साहित्यिक-संपादक रानबा गायकवाड, निवेदक बा. सो. कांबळे, युवा पत्रकार विकास वाघमारे, इंजि. प्रशिक कांबळे,वाहक यशवंत नाना गित्ते,वाहन परीक्षक बाळू देशमुख,
चालक भारती, वाहक पठाण, मेकॅनिक आघाव, चालक धोत्रे, चालक पी.साठे, चालक नाथराव मुंडे,
सुरक्षा रक्षक शुभम सगट, शंकर ताटे, आदिंच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत कपिल चिंडालिया यांनी अभ्यास व परिश्रम करून हे यश संपादन केले आहे.युवा पिढीला प्रेरणादायी असा त्यांचा जीवनप्रवास आहे. वाहतूक निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कपिल चिंडालिया यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.