• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मिशन झिरो डेथ’ने ग्रामीण भागातील आरोग्य तात्काळ कळणार गावागावात शिक्षकांकडून सर्व्हेला सुरुवात*

ByDeepak Gitte

Apr 22, 2021

*मिशन झिरो डेथ’ने ग्रामीण भागातील आरोग्य तात्काळ कळणार गावागावात शिक्षकांकडून सर्व्हेला सुरुवात*

प्रतिनिधी (बीड)

ND NEWS | दि- २२- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जि.प.चे सीईओ अजित कुंभार यांनी ‘मिशन झिरो डेथ’ हा उपक्रम हाती घेतला. शिक्षकांना सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्यानंतर शिक्षक गावामध्ये प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करून कुटुंबाच्या आरोग्याबद्दलची माहिती नोंद करून घेत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य तात्काळ कळणार असून कोणास काय आजार आहे याचीही इत्यंभूत माहिती प्रशासनाला समजणार आहे.
बीड जिल्ह्यात दररोज एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन मेहनत घेत असले तरी तितके यश येत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जि.प.चे सीईओ अजित कुंभार यांनी मिशन झिरो डेथ हा उपक्रम हाती घेतग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली. हे शिक्षक दारोदारी जावून प्रत्येकाची माहिती घेत कोणास काही आजार आहे का? याबाबतची नोंद करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य तात्काळ प्रशासनाला समजणार आहेत.

ग्रामीण भागात लसबद्दल जनजागृती नाही
जानेवारी महिन्यापासून कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 60 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली गेली. लसीकरणात ग्रामीण भाग प्रचंड प्रमाणात पाठीमागे आहे. लसबाबत तितकी जनजागृती न झाल्यामुळे लस घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.