• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाच्या सांगतेला प्रा.विजय मुंडे यांची भेट

ByND NEWS INIDIA

Oct 9, 2022

पौर्णिमेनिमित्त शहरातील पंचशील नगर येथील वैशाली महिला संघाच्यावतीने बौद्ध धम्माचा धर्मग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म यांचे वाचन करतात त्याच्या सांगता प्रसंगी बुद्ध विहार येथे परळी मार्केट कमिटीचे उपसभापती विजय मुंडे यांनी भेट दिली वैशाली महिला संघाच्या वतीने त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

जगाला शांतीचा संदेश देणारे तथाकथ गौतम बुद्ध आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. गेल्या सोळा वर्षांपासून ही परंपरा पंचशील नगर येथील महिला जोपासत आहेत.

बौद्ध परंपरेनुसार आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीमध्ये धम्म उपदेश आणि बुद्ध आणि त्याचा धर्म या ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. पंचशील नगर येथील रमाताई उबाळे यांनी गेल्या सोळा वर्षापासून ग्रंथाचे वाचन करत आहेत त्याला सोळा वर्ष पूर्ण झाले आहेत. यावेळी पंचशील नगर येथील पुरुष, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.