• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे विचार जपण्याची आणि रुजवण्याची गरज—प्रा.टी.पी.मुंडे

ByND NEWS INIDIA

Oct 9, 2022

 

प्रा.टी.पी.मुंडे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा!

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे विचार जपण्याची आणि रुजवण्याची गरज—प्रा.टी.पी.मुंडे

परळी वैजनाथ प्रतिनिधी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून ईद मिलाद उन-नबी हा सण मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यानिमित्त लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी ईदच्या गळा भेट घेऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे विचार मुस्लिम बांधवांनी समाजात रुजवण्याची आणि जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

परळी शहरात हा उत्सव मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी मुस्लिम बांधव पवित्र कुराण धर्मग्रंथाचे वाचन करतात आणि मशिदीत प्रार्थना करतात.आज परळी शहरातून जुलूस काढण्यात आला . मस्जिद सजवल्या जातात . जुलूस (रॅली) चे स्वागत लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी केले. यावेळी मुस्लिम बांधवांच्या गळा भेट घेऊन त्यांनी ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शफी उल्ला खान, विनायक गडदे, मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे, शेख इलियास भाई, जम्मू सेठ, श्याम गडेकर,शेख बाबा , नवनाथ क्षीरसागर, फय्याज भाई, आदी उपस्थित होते.