• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

म.बसवेश्वर कॉलनीतील नळ योजना कार्यान्वित ना.धनंजय मुंडेचे नागरिकांनी व्यक्त केले आभार व ऋण

 

न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड,पाणी पुरवठा सभापती सौ.उर्मिला गोविंद मुंडे व भावडया कराड यांच्या माध्यमातून कायम पाणी प्रश्न सुटला,नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठपुराव्यास यश

ND NEWS I :महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेमुळे परळी-वैजनाथ येथील महात्मा बसवेश्वर कॉलनीतील चाळीस वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची नळ योजना नगर परिषदे मार्फत कार्यान्वित करण्यात आली.
गट नेते वाल्मिकअण्णा कराड,पाणी पुरवठा सभापती सौ.उर्मिला गोविंद मुंडे व भावडया कराड यांच्या माध्यमातून तसेच नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठ पुराव्यामुळे कायम स्वरूपी याभागातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

म.बसवेश्वर कॉलनी परळी नगर परिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढी मध्ये असल्यामुळे याभागातील नागरिकांना मुलभूत सोयी मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो तसेच याभागामध्ये भूजल पातळी कमी असल्यामुळे बोअरवेलचे पाणी जाने-फेब्रूवारी महीण्यातच आटत असल्यामुळे राहत असलेल्या नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड गैरसोय होवून टँकरद्वारे पाण्याचे नियोजन करून पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

चाळीस वर्षापासून राहत असलेल्या म.बसवेश्वर कॉलनीतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची नळ योजना कार्यान्वित करून कायम स्वरूपी पाणी टंचाई दुर केल्याबद्दल ना.धनंजय मुंडे यांचे याभागातील नागरिकांनी आभार व ऋण व्यक्त केले असून न.प.गट नेते वाल्मिकअण्णा कराड,पाणी पुरवठा सभापती सौ.उर्मिला गोविंद मुंडे व नगरसेविका सौ.प्राजक्ता भावडया कराड,नगरसेवक चेतन सौंदळे,न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे,पाणी पुरवठा विभाग प्रमुख वामन जाधव,पाणी पुरवठा अभियंता प्रफुल्लकुमार साळवे,नळ जोडणी विभाग प्रमुख सिध्देश्वर घोंगडे यांच्यासह पालिका प्रशासनाचे प्रभूअप्पा साखरे,हनुमंतअप्पा घेवारे,बालाजी चीडबुके,विजयकुमार गायकवाड,भारत गुरव,भिमाशंकरअप्पा हालगे,महादेवअप्पा तिळकरी,राजाभाऊ मुकादम,शिवराज निला,विठ्ठल गायकवाड,अतुल ढापणे,पाराअप्पा गायकवाड,वसंत घेवारे,सदाशिवअप्पा बुद्रे,रमेश गायकवाड,रेवणअप्पा भास्कर,राजाभाऊ गायकवाड,संजय चव्हाण,निता राडीकर,पिराजी गायकवाड,दत्ता घेवारे,निरंजन गायकवाड,शैलेश पाटील,महादेव अवधूत,श्रीमती ढोलेताई,आदि नागरिकांकडून आभार व समाधान व्यक्त करण्यात आले.