• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कडेलोट कुणाचा होणार? उदयनराजे की शिवेंद्रराजे

ByND NEWS INIDIA

Sep 8, 2022

कडेलोट कुणाचा होणार? उदयनराजे की शिवेंद्रराजे

• माझी सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आहे तुमच्या सारखा मी आमदार झालेलो नाही
• 50 नगरसेवक सातारा विकास आघाडीचे येणाऱ्या निवडणुकीत निवडून येतील असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.

ND NEWS I
भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंट वरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिलं आहे.
मिशीला पीळ आणि ताव मारून काहीही होत नसतं असं म्हणत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. नगरपालिका निवडणुकीत उदयनराजेंचा कडेलोट होईल असा दावा देखील शिवेंद्रराजे यांनी केला आहे.
सातारा नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे साताऱ्याचे दोन्ही राजे पुन्हा एकदा एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सातारा नगरपालिकेच्या विकास कामांच्या मुद्द्यावरून दोन्ही राजांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सातारा नगरपालिका सध्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या ताब्यात आहे. उदयनराजे यांच्या हातातून सत्ता खेचून आपल्याकडे आणण्यासाठी शिवेंद्रराजे यांनी देखील कंबर कसली आहे.
माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत. असे सांगत जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंट वरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिलं आहे.
माझी सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आहे तुमच्या सारखा मी आमदार झालेलो नसल्याची खोचक टीका देखील उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर केलीय आहे.