• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

परळी (प्रतिनिधी): तालुक्यातील लोणी येथील सौ.लताबाई रमेश मंजुळ यांचे वयाच्या 35 वर्षी शेतात काम करत असतांना सर्पदंशाने 10 दिवसाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना दि.7 सप्टेंबर रोजी घडली आहे.

परळी तालुक्यातील लोणी येथे शेतात काम करत असतांना सौ.लताबाई मंजुळ यांना सर्पदंश झाला होता. त्यांना तात्काळ परळीतील सरकारी दवाखान्यात उपचारसाठी दाखल केले होते मात्र उपचारास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांना लातुर, अंबाजोगाई या ठिकाणी हलविण्याच्या सुचना येथील डॉक्टरांनी केल्या होत्या. मात्र 10 दिवसाच्या उपचारानंतर त्यांची अखेर प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर लोणी (ता.परळी) येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पती, 1 विवाहीत मुलगी, 2 मुले असा परिवार आहे.

राख सावडण्याचा कार्यक्रम दि.9 सप्टेंबर 2022 सकाळी 7.30 लोणी येथे होणार आहे.