• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अल्ताफ शेख आणि आरिफ सय्यद गणपती आरतीचे प्रथम मानकरी श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी

ByND NEWS INIDIA

Sep 1, 2022
  • अल्ताफ शेख आणि आरिफ सय्यद गणपती आरतीचे प्रथम मानकरी श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी

सर्व धर्म समभावची जपवणूक करण्यासाठी गणपतीच्या पहिल्या आरतीचा मान मुस्लिम बांधव अल्ताफ शेख व आरिफ शेख यांना देण्यात आला. कडा येथील श्रीराम ज्युनिअर कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजमध्ये गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने सुरू झाला. समाजामध्ये विविध उपक्रमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. श्रीराम ज्युनिअर कॉलेजने गणपतीच्या पहिल्या आरतीचा मान कॉलेजमधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला. यामधून विद्यार्थ्यांना सर्व धर्म समभाव आणि समानतेचा संदेश देण्यात आला. गणेश उत्सव हा सर्व जगामध्ये साजरा केला जातो यामधून अनेक ठिकाणी समाज हितासाठी चांगला संदेश जाण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

या गणेश उत्सव कमिटी मध्ये कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

याकरिता कॉलेजचे प्राचार्य श्री बाबासाहेब गिऱ्हे, उपप्राचार्य श्री सुभाष गांगर्डे, एन एस एस चे कार्यक्रमाधिकारी श्री दत्तात्रय ढवळे, सह कार्यक्रमाधिकारी श्री संतोष बनसोडे, गणेश उत्सव कमिटीच्या समन्वयक श्रीमती हेमाली बोडखे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, कॉलेजमधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.