• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राळेगावतील स्कूल ऑफ ब्रिलियंट येथे क्रिडा दिवस साजरा

ByND NEWS INIDIA

Sep 1, 2022

राळेगाव: स्कूल ऑफ ब्रिलियंट इंग्लिश मिडयम स्कूल राळेगाव येथे 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रिडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव तालुका क्रिडा संय्योजक तथा तालुका क्रिडा सचिव, न्यु. इंग्लिश हायस्कूल चे उपप्राचार्य श्री. विजय कचरे सर उपस्थित होते. शाळेच्या माण्यवरापैकी स्कूल ऑफ ब्रिलीयंट चे प्राचार्य श्री. बिडकर सर , संस्थेचे अध्यक्ष श्री . पेंटना सर , संस्थेचे अकॅडमीक ॲडवाइझर श्री. रमेश सर., संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र नागतुरे सर , संस्थेचे अकॅडमीक कॉरडीनेटर अनवर सर , गोपाळ कृष्ण सर यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
प्रथमतः मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचा पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली . मान्यवरांनी विद्यार्थांना खेळाचे महत्त्व सांगीतले. तसेच मेजर ध्यानचंद यांचा खेळासमंधी जीवनप्रवास कसा होता हे सुद्धा सांगीतले. 29 ऑगस्ट पासून दोन – तीन दिवस खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो – खो , ऍथलेटिक , रश्शिखेच, शुटल रन, जंपिंग रेस, संगीत खुर्ची इ. खेळाचे आयोजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमा शेवटी बक्षीस वितरण करण्यात आले , यामुळे दोन तीन दिवस विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमा साठी क्रिडा शिक्षक श्री. प्रफुल्ल खडसे सर व श्री महेश दहीवलकर सर व शाळेतील शिक्षक वृंद यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमा चे सुत्र संचालन श्री. निलेश ठाकरे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री . वाळके सर यांनी केले.
ND News मराठी करिता चेतन वर्मा राळेगाव यवतमाळ