• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

औष्णिक वीज निर्मिती केंद्रात चोरी करणारे जेरबंद

ByDeepak Gitte

Apr 1, 2022

औष्णिक वीज निर्मिती केंद्रात चोरी करणारे जेरबंद

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र 6 व 7 मधील कण्हेर बेल्ट चोरी गेल्याची घटना दि 20 मार्च रोजी उघडकीस आली होती या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपास करून मूळ मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की दि.१९ मार्च रोजी रात्री १० ते दि. २० रोजी चे सकाळचे ०५ च्या  दरम्यान संच क ६ व ७ (अ पाळीत) नाईट गस्त घालीत असताना ऑशगेट जवळ सुरक्षा भिंतीच्या बाहेर सुरक्षा अधिकारी गस्त घालीत आसतांना अज्ञात इसमाने त्याचे ताब्यातील एक छोटा हाती त्यामध्ये कन्हेर बेल्टचे दोन तुकडे अंदाजेसहा फुट कि. अंदाजे ६०००/रू चोरी करून घेऊन गेला.या प्रकरणी उप व्यवस्थापक सुरक्षा अधिकारी राजेंद्र रामदास सुरवसे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन 70/2022 कलम379 भादवीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता .
ग्रामीण पोलिसांनी तपास करून या प्रकरणातील आरोपी पवन भरत सातपुते वय 21 वर्षे रा. सेलु ता. परळी जि. बीड याला मोठ्या शिताफीने गुरुवार  दि.31 रोजी अटक करून टाटा कंपनीचे छोटा हत्ती एम एच 12 kp 6413 किमती 150000 व मुद्देमाल 6000 रुपये असा  एकूण 1,56,000 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.सदरील कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मारुती मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली भक्तराम गीते, पोलीस शिपाई डोरनाळे यांनी केली.