• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी , देखावे,  शोभायात्रा काढून, एकमेकांना  देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. यासाठीच जाणून घ्या गुढीपाडवा माहिती…

गुढीपाडवा याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. बांबूच्या टोकाला साडी किंवा जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुलिंबाची पाने लावून त्यावर तांब्या किंवा लोटा उलटा ठेवला जातो.

दारासमोर रांगोळी घालून तयार करून गुढी उभी केली जाते. या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याची ही प्रथा आहे, तसेच या दिवशी कडूनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागे ही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो तसेच कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ मिसळून चटणी तयार केली जाते. याचे भक्षण केल्याने शरीरात शक्‍तीचे कण पसरतात.

शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते, म्हणून केवळ ह्या दिवशी कडुलिंबाचे सेवन करायचे असे नसून या दिवसापासून वर्षभर याची आठवण राहावी हे सुचविले आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वतंत्र प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून सवंत्सर, पाडव, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.

गुढीपाडव्याचे सामाजिक महत्त्व आहे. विविध रोगांवर मात करणारी गुणकारी औषध म्हणजे कडुलिंब असतो आणि या दिवशी त्याचे खूप मोठे महत्त्व आपल्याला दिसून येते. कारण गुढी -पाडव्याच्या दिवशी कडूलिंबाचे विविध मिश्रणासह सेवन प्रसाद म्हणून केले जाते. तसेच लोकसंस्कृतीमध्ये देखील महत्त्वाचे स्थान आहे