• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*टोकवाडी- नागापुर रस्त्यावरील वीट भट्टी धारकांचे अतिक्रमण हटवा, परळी सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील कार्यालयाकडे प्रा. विजय मुंडे यांची मागणी!* *त्वरित दखल न घेतल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करणार!*

ByND NEWS INIDIA

Feb 1, 2022

परळी वैद्यनाथ/प्रतिनिधी

टोकवाडी- नागापूर -मांडेखेल हा रस्ता तीस ते चाळीस गावांना जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर टोकवाडी रोडवर वीट भट्टी धारकांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण परळी सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील कार्यालयाने त्वरित हटवावे अशी मागणी परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांनी केली आहे.

Bरहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावरून ऑटो धारक मोटरसायकलवाले दूधवाले व नागरिक ये-जा करत असतात या रोडवर वीट भट्टी मुळे भयानक धूळीचा सामना त्यांना करावा लागतो.या रोडवर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे त्यामुळे रोडवर खड्डे पडले आहेत. वाऱ्याने धुळ उडून अनेक
आपघात होतात.

समोरचे वाहन धुळीमुळे दिसत नसल्याने लोकांचे आपघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत लोकांना डोळ्याचे विकार, हाडाचे आजार, श्वसनाचे आजार जडत आहेत. राखेचे प्रदूषण होत असल्यामुळे याचा मानसिक शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.

टोकवाडी ते नागापूर रोडवर सर्व वीट भट्टी धारकांनी रस्ता व्यापून टाकला आहे ऐन रस्त्यावर विटा च्या गाड्या उभ्या राहतात त्यामुळे येणाऱ्या वाहनांना त्याचा त्रास होत आहे. सर्व शासकीय नियम विविध पद्धती धारकांनी धाब्यावर बसवले आहेत तसेच रोडवर खराब विटांचा ढीग टाकला आहे तरी प्रशासन याकडे तिळमात्र बघायला तयार नाही आणि मूग गिळून गप्प का बसले आहे असा प्रश्न नागरिक विचारात आहेत . या सर्व बाबींची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील कार्यालय परळी यांनी वीटभट्टीचे अतिक्रमणे हाटवावीत अन्यथा जवळच्या स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.