• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील नायगाव येथे दि 28 रोजी उंदरी नदीच्या पूर परिस्थिती निर्माण झाली होती शेतीचे अतोनात नुकसान झाले तीन ते चार फूट जमीन वाहून गेली लोकांच्या घरात पाणी शिरले होते जिल्हा परिषद शाळा नायगाव येथेही पाणी शिरून शालेय साहित्य तसेच शाळेतील शाळा उपयोगी संपूर्ण साहित्य पाणी शिरल्यामुळे वापरण्याजोगे राहिले नाही त्याचेच व्हिडीओ व फोटो पाहून पुरामुळे झालेल्या भीषण परिस्थिती निर्माण झालेल्या व पुरात ज्याची घर पाण्यात गेली होती त्याचेच फोटो व व्हिडीओ पाहून अर्चना ताई सानप यांनी परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन ही गोष्ट सचिन ढवळे मित्र मंडळ यांच्या समोर परिस्थिती मांडून त्याच्या साहाय्याने डी एड बी एड असोसिएशनच्या अर्चना सानप यांच्या माध्यमातून नायगाव येथे 10 किराणा किट तसेच संसार उपयोगी भांडी देण्यात आली तसेच यावेळी बोलताना अर्चना ताई सानप व मुंडे मॅडम यांनी सांगितले की शाळेसाठी देखील होईल ती मदत लवकरच करू यावेळी उपस्थित डी एड बी एड असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्ष अर्चना ताई सानप,जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी मुंडे,बीड तालुका अध्यक्ष ज्योती खंदारे,दीपक साखरे,अभिषेक सोळंके, कोमल मस्के, संभाजी ब्रिगेड चे राहुल खोडसे ग्राम पंचायत सदस्य श्याम खोडसे आदी उपस्थित होते