• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

स्वताजवळील वस्तु विकुन युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांनी पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात….

ByND NEWS INIDIA

Oct 6, 2021

 

 

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे

 

आज दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी मागच्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीने रौद्र रुप धारण केल्यामुळे केज तालुक्यातील पैठण व नायगाव या गावातील काही लोकांचे घरदार वाहुन गेले तर काही लोकांच्या घरातील सर्व गरजेच्या वस्तू अन्नधान्याची पाणी घरात शिरल्यामुळे नासाडी झाली.यामध्ये नुकसान ग्रस्त लोकांच्या मदतीसाठी काहि संस्था व लोकांनी आपापल्या परीने मदत केली.त्यावेळी दोन्ही गावची परीस्थिती शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या सोबत गेल्यावर समोरासमोर पाहुन त्या लोकांसाठी काहितरी करायचं या निर्धाराने युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांनी त्यांच्याकडुन शक्य होईल ति थोडीथोडकी मदत करण्यासाठी आपल्या जवळील मोबाईल,ब्रासलेट व वाॅच विकुन आलेल्या १६५०० रुपयांचा काही कुटुंबांला किमान काही दिवसांचा तरी आधार मिळेल इतकं किराणा सामान खरेदी केले होते.

      आज त्या किराणा सामानाच्या किट तयार करुन शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या हस्ते पैठण येथील दहा गरजु कुटुंबांना व नायगाव येथील दहा गरजु कुटुंबांना वाटप केले.

यावेळी तालका संघटक अशोक जाधव,तालुका समन्वयक बाळासाहेब पवार,पैठणचे सरपंच रुस्तुम भैय्या चौधरी,संभाजी ब्रिगेडचे राहुल भैय्या खोडसे,काॅलेज कक्षाचे किशोरी घुले,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता मुजमुले सर,प्रविण भैय्या खोडसे,सुरज चौधरी,ऋषीकेश चौधरी,शशिकुमार चौधरी,दत्ता चौधरी,मुकेश कसबे सह दोन्ही गावचे नागरिक उपस्थित होते….