• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज तालुक्यात पावसाचा कहर शेतीपिकांचे मोठे नुकसान,नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करावी शेतकऱ्यांनची मागणी

ByND NEWS INIDIA

Sep 26, 2021

 

 

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे या पावसामुळे ऊस तूर कापूस सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे

काढणीला आलेल्या सोयाबीनचे व काढलेल्या सोयाबीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच बोभाटी नदीला पूर आल्यामुळे नदी काठच्या काही शेतकऱ्यांनचे सोयाबीनचे ढीग पाण्याखाली गेले आहेत तर काही शेतकऱ्यांचे सोयाबीनचे ढीग हे वाहून गेले आहेत.तरी तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी हादगांव येथील शेतकरी सदाशिव वायबसे व महादेव वायबसे यांनी केली आहे