• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

 

तालुका प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 

हदगाव येथील अंगणवाडी केंद्रात आज दिनांक २५ सप्टेंबर शनिवार रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी लटपटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व चिंचोली माळी सर्कलच्या मुख्य सेविका तरकसे मॅडम यांच्या उपस्थितीत पोषण आहार प्रदर्शन संपन्न झाले.प्रत्येक अंगणवाडी केंद्रात लहान बालकांना शिक्षणासोबत गाणी वेगवेगळे खेळ शिकवण्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे पोषण आहारही दिले जातात अधून-मधून पोषण आहाराविषयी अंगणवाडी केंद्रात वेगवेगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत पोषण आहार विषयक कार्यक्रम घेतले जातात.

पोषण आहार यामुळे बालकांचा सर्वांगी विकास व्हावा हा त्यामागचा मूळ उद्देश असतो याच निमित्ताने आज हदगाव येथील अंगणवाडी मध्ये पोषण आहार प्रदर्शन भरवून यामध्ये आहार प्रात्याक्षिक दाखवण्यात आले.आणि फळ भाज्या व कडधान्यचे महत्व सांगण्यात आले.

तसेच गरोदर मातांचे डोहाळे जेवण व अर्ध वार्षिक वाढदिवस व स्त्री जन्माचे स्वागत करून 1 हजार दिवस पूर्ण बाळाचे महत्व सांगण्यात आले .तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर मार्गदर्शनही करण्यात आले.

यावेळी अंगणवाडी केंद्रात सुंदर अशा रांगोळ्या काढून सजावट केली होती या प्रदर्शनात गावातील लाभार्थी महिलांसह इतरही महिला व किशोरवयीन मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. प्रदर्शनाबद्दल सर्व महिलांनी आनंद व्यक्त करत अंगणवाडीताईंच्या कौतुकही केले पोषण आहार प्रदर्शनासाठी अंगणवाडी सेविका अनुसया वायबसे,मीरा नकाते, रेवती कुलकर्णी, लता शिंदे, नयमोनिसा पठाण व आशा सेविका संगीता वायबसे मदतनीस तारामती काळे यांनी परिश्रम घेतले.