• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अखेर खरीप 2020 चा पिकविम्याचा मार्ग मोकळा – पुजा मोरे “स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन

ByND NEWS INIDIA

Sep 20, 2021

“स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन

 

मागील खरीप हंगाम 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी कृषी,व महसूल तसेच केंद्राच्या एन. डी. आर. एफ पथकाने पंचनामे करून देखील शेतकरी पिकविम्याच्या लाभापासून वंचित होते.त्या संदर्भात शासनाने शासन निर्णय काढून तात्काळ जिल्हा कृषी अधीक्षक यांना याद्या मागविण्या संदर्भात तातडीचा शासननिर्णय काढला आहे.यामुळे गाव पातळीपासून ते पावसाळी अधिवेशनात विधानभवन व पुण्याच्या कृषी आयुक्तालयावर आंदोलन केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे.

2020 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्‍चात नुकसान भरपाई अंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संबंधित विमा कंपनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत पूर्वसूचना देणे अपेक्षित होते व त्या नंतर वैयक्तिक पंचनामा करून नुकसान भरपाई बाबत पुढील कारवाई करण्यात येते मात्र हंगामात परिस्थिती आणि कंपनीचा टोल फ्री क्रमांक न लागणे,कंपनीशी ई-मेलवर संपर्क न होणे,क्रॉप इन्शुरन्स पूर्वसूचना देण्यासाठी विविध अडचणी या बाबींमुळे नुकसानग्रस्त शेतकरी विहित वेळेत विमा कंपनी सूचना देऊ शकले नाहीत पिक विमा योजनेत सहभागी असताना मदतीस पात्र शेतकर्यांना विमा कंपनीस केवळ सूचना न दिल्याने मदतीपासून वंचित रहावे लागले आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांचे NDRF पंचनामे गृहीत धरून त्यांना पिक विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शासनाची भूमिका आहे.असे शासननिर्णयात म्हणले आहे.

 

याविषयी सविस्तर माहिती अशी की खरीप 2020 हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यातील 42 लाख 91 हजार दोनशे एक शेतकऱ्यांनी भाग घेतला होता योजने अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालेले नुकसान याबाबी एकूण 5,20, 446 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम 392.12 कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान बाबी अंतर्गत 1 लाख 30 हजार 671 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम 21.7 ते 40 कोटी विमा कंपनीमार्फत वाटप करण्यात आले असून काढणीपश्‍चात नुकसान भरपाई अंतर्गत 1,33,373 शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम 980 पॉइंट 67 कोटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे तारीख 2020 हंगामात अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध पिकांचे नुकसान झाले होते त्या अनुषंगाने एकूण 62 लाख 24 हजार 797 शेतकऱ्यांचे 30 लाख 51 हजार 451 हेक्टर नुकसान ग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात येऊन रक्कम 0 851 पॉईंट 45 कोटी एवढी मदत एनडीआरएफ मधून प्रस्तावित करण्यात आली आहे.

 

मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर डझनभर मंत्र्यांनी दौरे केले पण नंतर सर्वच राजकीय पक्ष याबाबत मूग गिळून गप्प होते.त्यानंतर गावोगावी बैठका घेऊन तलवाडा ता.गेवराई जि.बीड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वात केले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात विधानभवणावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी त्यांना मुंबई येथे अटक करण्यात आली होती. तेवढ्यावर न थांबता विदर्भ,मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्याच्या कृषी आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले.या आंदोलनाची दखल मा.कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी घेतली व तातडीची बैठक लावली.यावेळी एन. डी. आर. एफ. चे निकष ग्राह्य धरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी बाजू शिस्तमंडळाने मांडली होती.या शिस्तमंडळात मराठवाडा अध्यक्ष श्री.गजानन बंगाळे, श्री. प्रशांत डीक्कर उपस्थित होते.

 

गावपातळीपासून ते मुंबई, पुण्यापर्यँत लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी सांगितले आहे.