• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळीत अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात व दुकानात घुसले पावसाचे पाणी..!

ByDeepak Gitte

Sep 7, 2021

परळीत अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात व दुकानात घुसले पावसाचे पाणी..!

कोट्यावधी रुपयांची विकासकामे करत असल्याचे सांगणाऱ्यानी स्वच्छतेसाठी किमान एक नवीन jcb तरी घ्यावा?

नगरपालिकेच्या स्वछता विभागाचे पूर्णपणे अपयश- प्रा पवन मुंडे.

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

ND NEWS | दि.०७- परळी: गेल्या दोन दिवसांपासून शहरात संततधार पाऊस होत असून या पावसाचे पाणी तुंबलेल्या नाल्यामुळें शहरातील गंगासागर ,मालिकपूरा, नाथ रोड वरील दुकानां सहित अनेक भागांतील लोकांच्या घरात  घुसले असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे,हे पूर्ण पणे परळी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे अपयश असून त्यांनी नागरिकांच्या जीवनाशी- जीवाशी खेळू नये अशा शब्दात भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी परळी नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत टीका केली आहे.

शहरात गल्लोगल्ली सर्वच भागात अस्वच्छतेमुळे व तुंबलेल्या नाल्यामुळें पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात व दुकानात घुसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत,मागील दोन दिवसांपासून होणाऱ्या संततधार पावसाने शहरातील बहुतांशी भागांत घरात व दुकानात पाणी घुसून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ज्यांच्या दुकानात पाणी घुसले त्या व्यापाऱ्यांना झालेल्या नुकसानी मुळे आपले अश्रू आवरता आलेले नाहीत,स्वछतेसाठी महिन्याला 28 लाख  बोगस खर्च करणाऱ्या न. प. कडे स्वच्छते साठी एकच जुनाट jcb मशीनआहे जी सारखी बंद अवस्थेत असते, तरी  दीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या परळी शहराच्या स्वछते करिता किमान एक नवीन jcb मशीन तरी घ्यावी व नागरिकांना होणारा त्रास थांबवावा तसेच प्रशासनाने पाणी घुसलेल्या भागांचे त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी व  स्वच्छता विभागाने अस्वच्छते बाबत  त्वरित उपाययोजना कराव्यात असे आवाहन नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.