• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

केज, ता. २६ : केज तालुक्यातील कासारी येथे कै. लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या स्तंभाचे माजी खासदार रजनी पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री अशोक पाटील आणि माजी खासदार रजनी पाटील यांचे निकटवर्तीय तथा माऊली विद्यापीठाचे प्रशासक लक्ष्मणराव डोईफोडे यांचे मागीलवर्षी सात ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज (ता. २६) गुरुवारी कासारी येथे हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर क्रांतिवीर आत्माराम बापू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या स्तंभाचे अनावरण करण्यात आले.

 

या कार्यक्रमास मा. नगराध्यक्ष आदित्य पाटील, जि. प. मा. सभापती राजेसाहेब देशमुख, राहुलभैय्या सोनवणे, अंबासाखरचे व्हाईस चेअरमन हनुमंत मोरे, प्रविणकुमार शेप, पशुपतीनाथ दांगट, दलीलभाई ईनामदार, बाळासाहेब ठोंबरे, कबिरोद्दीन ईनामदार, अमर पाटील, कपिल मस्के, अरुण गुंड, समीर देशपांडे, दिनकर राऊत, प्रेमजीत हजारे, सुजीत सोनवणे, विश्वजीत पाटील, अक्षय गिते, रंजीत खोडसे, चेतन नेहरकर, सचिन रोडे, माऊली विद्यापीठ केज व भगवान बाबा शिक्षण मंडळ कासारी येथील कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.