• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महिलांच्या विविध मागण्यांसाठी मनीषा ताई घुले यांच्या नेतृत्वाखाली महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केज येथे भव्य मोर्चा

ByND NEWS INIDIA

Aug 26, 2021

 

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

गेल्या अनेक दिवसांपासून शासनाने निर्गमित केलेले अनेक परिपत्रक कागदोत्रीच असुन त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने व महिला, ऊसतोड मजूरांची शिक्षणापासून वंचित असलेली मुले, त्यांचे होत असलेले स्थलांतर ,महिला वरील होणारे अन्याय अत्याचार ,महिला पुरुष समान अधिकार, अशा अनेक मागण्या शासनाकडून पदरात पाडून घेण्यासाठी महिला अधिकार मंच,महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने आज दि.२६ ऑगस्ट २०२१ गुरुवार रोजी केज तहसील वर धडक मोर्चा काढण्यात आला.

महिला अधिकार मंच,महाराष्ट्र ही संघटना गेल्या सहा वर्षापासून महिलांच्या विविध प्रश्नावर संपूर्ण बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात काम करत असून महिलांना यातून न्याय देण्याचे काम करत आहे. तालुक्यातील अनेक निराधार, विधवा, परित्यक्ता, ऊसतोड मजूर महिला यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी ही संघटना काम करत असून महिलांच्या विविध प्रलंबित मागण्या शासन स्तरावरून पदरात पाडून घेण्यासाठी आज महिला अधिकार मंच, महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने केज तहसीलवर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये घर व जमिनी पती पत्नीच्या नावे करण्यात याव्यात, महिलांचे कारण नसताना गर्भाशय काढण्यावर निर्बंध घालून तात्काळ कायदा करण्यात यावा,गर्भाशय काढलेल्या महिलांना पेन्शन लागू करावी,वंचित लाभार्थ्यांना रेशनकार्ड तात्काळ मिळावे,निराधारांना तात्काळ विनाअट तीन ३०००/-(हजार रुपये )पेन्शन लागू करावी,वाढत्या महागाईवर तात्काळ आळा घालण्यात यावा, मजुरांच्या हाताला काम मिळावे,महिलांवरील वाढते अन्याय,अत्याचार त्वरित थांबून महिला कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,विधवा परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांच्या मुलांना संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे,ऊसतोड कामगार मुलांचे स्थलांतर थांबवून त्यांना गावातच मुलांच्या संख्येची अट न ठेवता वस्तीगृह सुरू करावे. या मागण्यासाठी महिला अधिकार मंच महाराष्ट्र, केज च्या वतीने तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष मनिषाताई घुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून रॅलीच्या स्वरूपात रॅली मंगळवार पेठ येथून केज बीड या मुख्य रस्त्याने केज तहसीलवर कार्यालयावर धडकली. मोर्चातील वरील प्रमुख मागण्यासाठी केज तहसीलदार यांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला. वरील मागण्या शासन दरबारी मांडून आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी या महिला अधिकार मंच महाराष्ट्र आणि मराठवाडा लोक विकास मंच यांच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने जिल्हाभरातील महिलानी उपस्थितीती लावली होती. यावेळी मनिषा ताई घुले अध्यक्ष महिला अधिकार मंच,महाराष्ट्र, रजनीताई काकडे बीड जिल्हा अध्यक्ष , लक्ष्मीताई बोरा तालुका अध्यक्ष, तसेच कौशल्या थोरात, ज्योती साखरे , दीपाली गळंगे , शीतल लांडगे , सुप्रिया गीते , प्रतिभा देशमुख , सुनिता बिरलिंगे, प्रिया चाळक , शिल्पा सोनवणे , वंदना कांबळे सह असंख्य महिला उपस्थित होत्या.