• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

“स्वाभिमानी” च्या आंदोलनाचे सकारात्मक परिणाम केज तालुक्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरुस्ती साठी 12 कोटी 40 लाख रु.चे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे सादर !!

ByND NEWS INIDIA

Aug 19, 2021

 

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील होळ ,बनसारोळा पंचक्रोशीतील सर्वच गावाला जोडणारे मुख्य रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. गावातील नागरिकांना, वाहनधारकांना, महिलांना, आबालवृद्धांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते.सद्या पावसाळ्यात तर कोणत्याही रस्त्याने जाणे मुश्किल बनले आहे. वारंवार निवेदन ,आंदोलन करून सुद्धा प्रशासन ,स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी,आमदार, पालकमंत्री, खासदार , जिल्हा प्रशासन मूग गिळून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अनेक वर्षांपासून जटील बनलेल्या रस्त्याची कायमस्वरूपी समस्या सोडवून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे सातत्याने आंदोलनात्मक संघर्ष करत आहेत .स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत असून

दि.27 जुलै 2021 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई-कळंब राज्य महामार्गावर बोरीसावरगाव येथे दीड तास आक्रमक चक्का जाम आंदोलन केले होते

याची सकारात्मक दखल घेत जि.प.बांधकाम विभाग क्र.2 बीड कार्यकारी अभियंता यांनी तालुक्यातील 9 अत्यंत खराब असलेले रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यासाठी 12 कोटी 40 लाख रु .व तात्पुरती दुरुस्ती साठी 1 कोटी 55 लाख रु ची प्रशासकीय मंजुरी मिळावी म्हणून विहीत प्रपत्र मध्ये जिल्हाधिकारी बीड यांचेकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

सदर प्रस्तावातील रस्त्यांना तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी केज जि.प.बांधकाम उपविभागीय अभियंता श्री. एस. डी. पवार साहेब ,शाखा अभियंता श्री. सय्यद साहेब

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी आज दि.18 ऑगस्ट रोजी प्रस्तावित रस्त्यांची संयुक्त स्थळ पाहणी केली. यावेळी जेष्ठ नेते अशोक साखरे, प्रमोद पांचाळ, चंद्रकात अंबाड,सुग्रीव करपे, शिवाजी भाकरे,अविनाश करपे ,गोविंद करपे,डिगंबर करपे ,जयंत कुलकर्णी, बंडू करपे, आदी गावकरी उपस्थित होते.

——————-/———————— या रस्त्यांना मिळणार प्रशासकीय मंजुऱ्या

*चंदनसावरगाव-जवळबन* *जवळबन-बोरीसावरगाव*

*सावळेश्वर-जवळबन*

*लोखंडीसावरगाव-कानडी बदन*

*बनसारोळा- सौंदाणा*

*बनसारोळा-आवसगाव*

*सावळेश्वर-आवसगाव*

*नायगाव-आवसगाव*

*लाडेगाव-दिपेवडगाव*

*लाडेगाव-जवळबन*

*कानडीबदन-सोमनाथबोरगाव*

*आनंदगाव-सारणी*

*आनंदगाव-भाटुंबा*

 

–//प्रतिक्रिया—//

होळ,युसुफवडगाव सर्कल मधिल रस्ते गेली 10 वर्षांपासून प्रचंड मोठे खड्डे पडुन खराब झाले असल्याने नागरिकांना ,आबालवृद्धांना दैनंदिन वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे.

प्रत्यक्ष रस्ता कामे सुरू होईपर्यंत आमचे

आंदोलन चालुच राहील—

श्री. कुलदीप करपे जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना (पक्ष),बीड जिल्हा.