• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लहुरी येथील नरेगातील भ्रष्टाचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा – संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष कैलास चाळक

ByND NEWS INIDIA

Aug 18, 2021

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील लहुरी येथील रोजगार हमीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक यांनी गट विकास अधिकारी प.स.केज यांना मंगळवारी देण्यात आले.

याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील मौजे लहुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात रोजगार हमीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.

तरी याविषयी दि.०६/०८/२०२१ रोजी जा.क्र.२०२१/जि.प.बीड/म.ग्रा.रोहयो/कावि-६३३ पत्रकान्वये जिल्हा परिषदेचे सि.ई.ओ अजित कुंभार यांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तरी अद्याप पर्यंत गुन्हे दाखल केले नाहीत.

लव्हुरी ता. केज जि. बीड येथील ग्रामपंचायत कार्यालयाने मनरेगा योजनेत 1701084/रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब बीड यांनी चौकशी समिती स्थापन करुन संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आपणास

आदेशित करुनही आपण अद्याप पर्यंत गुन्हे दाखल केले नाही.

तरी भ्रष्ठाचारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी न घालता लवकरात लवकर गुन्हे दाखल करावेत अन्यथा गावकऱ्या समवेत तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

असा जळजळीत ईशारा कैलास चाळक व कृष्णा जगताप यांनी दिला आहे.

 

चौकट:-

गट विकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क होऊ शकला नाही परंतु तालुक्यातील ईतर रोजगार हमीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई कधी होणार याची सध्या जनतेतून जोरदार चर्चा सुरू आहे.