• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज प्रतिनिधी -हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील धोत्रा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरू असलेल्या नवनिर्माण जनसंपर्क यात्रेच्या माध्यमातून आज दिनांक १७ ऑगस्ट मंगळवार रोजी धोत्रा येथील नागरिकांच्या अडचणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या

यामध्ये धोत्रा या गावाला जोडणारे चार रस्ते आहेत त्यापैकी एकही मजबूत व चांगला रस्ता नाही पावसामध्ये या गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे धोत्रा गावच्या रस्त्यासाठी आज दिनांक १७ ऑगस्ट २०२१ मंगळवार रोजी केज तहसीलदार यांना निवेदन देणार असून दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी बरड या ठिकाणी गावच्या रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा निर्णय धोत्रा येथील जनसंपर्क यात्रेत मनसे जिल्हाध्यक्ष सुमन धस यांनी घेतला आहे.

या कार्यक्रमास मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,मनसे शेतकरी सेनेचे केज तालुका अध्यक्ष बाबुराव ढाकणे,मनसे चे सोशल मीडिया नांदूरघाट अध्यक्ष संदीप सांगळे,गिविंद हाके,श्रीकांत वाघमोडे,गोपाळ हाके,धोत्रा गावचे सरपंच धनराज गीते,मनसे धोत्रा शाखेचे बालाजी गीते,अमोल गीते,अंकुश ठोंबरे,अशोक गीते,बापूराव गीते,सुग्रीव गीते आदींसह गावातील नागरिक व मनसे चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.