• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज प्रतिनिधी -हनुमंत गव्हाणे

 

आज दिनांक 15ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन कॅन्सरग्रस्त सुबाबाई पवार या हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलेच्या उपचारासाठी युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात व युवा नेतृत्व ज्ञानेश्वर(शेंडाभाऊ) थोरात यांनी पुढाकार घेऊन गाववासियांना मदतीची हाक दिली होती.प्रत्येक वेळी गावातील कोणी गोरगरीब असल्यास सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ढाकेफळच्या युवकांनी भरभरुन मदतीचा हात दिला.त्यांना आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारे गोविंद चटप(API),शितलताई,अश्विनीताई छोटवे,विजय थोरात व अनिल थोरात (विजय मोटर्स),सुशिल पांचाळ,दत्ता शामराव थोरात,शरद चटप,पद्माकर चटप,उमेश मुळे,करण थोरात, छत्रगुण चटप,नितिन थोरात,अशोक डिकले,बालासाहेब थोरात, सदानंद थोरात,ज्ञानेश्वर थोरात, अरविंद थोरात तर काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर मदत केली.त्याच पैशातुन सुबाबाई पवार यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी त्यांना किमान तीन महिने पुरेल इतका किराणा व उरलेली रक्कम सदानंद थोरात (STI) व अशोक थोरात सर यांच्या हस्ते सुबाबाई पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रंजित घाडगे गुरुजी,बालासाहेब थोरात,करण थोरात,श्रीमंत चटप,भैरवनाथ थोरात,अभिषेक चटप सह ते कुटुंबीय उपस्थित होते….