• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे सर्व शासकिय/निमशासकिय कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला जि.प.प्रा.शा.हनुमान वस्ती येथील ध्वजावंदन बळीराम चौरे यांच्या हस्ते करण्यात आला व तंबाखु मुक्तीची शपथ घेण्यात आली.मुख्याधापक, गोकुळ सारूक, सहशिक्षक महाविर मोहिते, शिवाजी चौरे उपस्थित होते.

कै.श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामीण वाचनालय,जिवाची वाडी ग्रंथालयाचा ध्वजावंदन भिकाराम सारूक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संजय कुटे, ग्रंथपाल सुभाष सारूक,शोभाताई चौरे, शिक्षक, वाचक सभासद,ग्रामस्त मोठ्या संखेने उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय जिवाची वाडी येथील ध्वजावंदन सरपंच,श्रीम.कुसूम कुटे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपसरपंच संभाजी सारूक,राजाभाऊ फुंदे,आरोग्य सेविका,श्रीम.सुरेखा सानप,आशा स्वयंसेवीका, उषाताई चौरे व आशाबाई चौरे,संगणक चालक, विक्रम चौरे, हनुमंत कांबळे, नवनाथ सोळुंके व ग्रामस्त उपस्थित होते.

जि.प.उच्च प्रा.शाळा जिवाची वाडी येथील ध्वजावंदन शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष,भगवान चौरे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी मुख्याधापक,बचुटे बी एम,चाटे एस एम, ढवळशंख सर, ठोंबरे सर, काळे सर,श्रीम.जाधवर, श्रीम.गुट्टे,श्रीम. उंडाळे उपस्थित होते.

युनानी दवाखाना जिवाची वाडी येथील ध्वजावंदन सरपंच,श्रीम. कुसूम कुटे यांच्या हस्ते झाला या वेळी आरोग्य सेविका,श्रीम.सुरेखा सानप, सय्यफोदिन,डी बी दळवी, आशा स्वयंसेवीका ,श्रीम.उषाताई चौरे व आशाबाई चौरे व ग्रामस्त उपस्थित होते.

पशुवैद्यकीय दवाखाना जिवाची वाडी येथील ध्वजावंदन डॉ.जिरे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी मच्छीद्र लांब व ग्रामस्त उपस्थित होते.