• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

केज – प्रतिनिधी हनुमंत गव्हाणे

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बीड येथील अंबाजोगाई-कळंब राज्य रस्त्यावर जवळबन गावाला जोडणाऱ्या तिन्ही मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

मागील 10 वर्षांपासून या रस्त्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन, निवेदन दिले तसेच केज मतदारसंघातील प्रमुख ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवून आक्रमक पवित्रा घेतला होता.आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन केले आहे.यावेळी आगामी काळात मतदानावर बहिष्कार टाकणार असून येणाऱ्या काळात गनिमीकावा आंदोलन स्वाभिमानी स्टाईलने छेडणार असल्याचा इशारा कुलदीप करपे यांनी सरकारला दिला आहे.

 

होळ,बनसारोळा,युसूफवडगाव गटातील बहुतांशी रस्ते रहदारी सारखे राहिलेले नाहीत.वारंवार मागणी निवेदन करूनही उपयोग झाला नाही.रस्त्यांच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली कळंब- अंबाजोगाई राज्य महामार्गावर बोरीसावरगाव येथे मंगळवारी रोजी एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.तहसीलदार डी सी मेंडके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन कांबळे, जि .प.बांधकाम उपविभाग केज अभियंता श्री बी. ई.खेडकर, आदींच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.