• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*केज भाजपच्या वतीने अभूतपूर्व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न* (माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला सामाजिक उपक्रम)

ByND NEWS INIDIA

Jul 27, 2021

 

केज- हनुमंत गव्हाणे

ता.२६ – राज्याच्या माजीमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज भाजपच्या वतीने (ता.२६) अभूतपूर्व गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न झाला.यावेळी सुमारे सहाशे गुणवंत विद्यार्थी सन्मानित करण्यात आले.

माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपच्या वतीने एक बैठक घेण्यात आली होती.त्यामध्ये सामाजिक उपक्रम म्हणून गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार ता.२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सदरील कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जेष्ठ नेते रमेश आडसकर तर प्रमुख अतिथी म्हणून आ. नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.वासुदेव नेहरकर यांनी केले. तर आ.नमिता मुंदडा, रमेश आडसकर, विजयकांत मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले तालुक्यातील 48,शाळा व 545 गुणवंत विद्यार्थी तसेच शिक्षक,मुख्याध्यापक, पालक व अन्य नागरिक सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना फेटे बांधून मान्यवरांच्या हस्ते सर्व 545 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जि. प.सदस्य विजयकांत मुंडे, उपसभापती ऋषीकेश आडसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, मुरलीधर ढाकणे,रमाकांत मुंडे , सुरेंद्र तपसे, सुनील घोळवे

महादेव सूर्यवंशी,सौ. जयश्री गदळे, दिनकर चाटे,शरद इंगळे,सुदाम पाटील,लिंबराज फरके,शेषेराव कसबे,कैलास पाटील,अरुण धपाटे,अशोक मोराळे,अंगद मुळे,मच्छिद्र सांगळे , श्रीकांत भांगे,ईश्वर बिक्कड,चंदू मिसाळ,योगेश शिंदे, अनिरुद्ध शिंदे,संतोष देशमुख,रामराजे तांबडे,रामचंद्र गाताडे,दत्तात्रय बावले, बाळासाहेब भाकरे, यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केज तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी केले.