• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

ByND NEWS INIDIA

Jul 6, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांचा वाढदिवस 6 जुलै रोजी कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमाने साजरा केला. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण,फळवाटप असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.  केज तालुक्यातील चिंचोलीमाळी, जवळबन या ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले. केज उपजिल्हा रुग्णालय येथे रूग्णांना फळवाटप करण्यात आले. केज शहरातील दर्गा येथे बजरंगबप्पा सोनवणे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी चादर अर्पण करण्यात आली.तसेच बीड जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, युवक तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे,शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड,पंचायत समिती सदस्य नारायण शिंदे, बंडु चौधरी, पिंटु ठोंबरे,विलास जोगदंड, बबन जाधव, परमेश्वर चौधरी, हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शरीफभाई सय्यद, बीड जिल्हा सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सुरज खोडसे,सोशल मिडिया तालुकाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड,किसान सेल तालुकाध्यक्ष पद्माकर सावंत,गुलाब पठाण, श्रीकांत घुले,गणेश सावंत,अकबर सय्यद,आकाश गायकवाड, अमोल गवळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.