• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ भाजपा च्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन.*

ByND NEWS INIDIA

Jul 6, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे                                                          केज  तालुका  भारतीय     जनता  पक्षाच्या  वतीने  तोंडाला  काळ्या  फिती  बांधून  जाहीर  निषेध  करण्यात  आला.  अधिवेशन  काळात  भारतीय  जनता  पक्षाच्या  आमदारांनी   सभागृहात  त्यांच्या  मतदार  संघातील विविध सामाजिक,शैक्षणिक,शेतकऱ्यांच्या,व्यापाऱ्यांच्या,कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व इतर विषयावर भाजपा आमदारांनी सभागृहात आवाज उठवला तो आवाज बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 12 आमदारांना निलंबित केले हे निलंबन निषेधार्थ असून सदरील आमदार हे जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेले आमदार आहेत ते मतदार संघातील जनतेचे प्रश्न मं डणायसाठी अधिवेशनात सहभागी होतात त्यांच निलंबन कारण म्हणजे लोकशाहीचा अपमान असून या निलंबनाच्या निषेधार्थ केज तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून मूकआंदोलनकरण्यात आले व  ना.तहसीलदार केज मार्फत मा.मुख्यमंत्री यांना सर्व 12 आमदारांना त्यांच्या मतदार संघातील जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी तात्काळ निलंबित रद्द करावे अशी विनंती करण्यात आली .या आंदोलनात बीड जिल्हा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाअध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर,पंचायत समिती सभापती विष्णू (भाऊ)घुले मा.सभापती संदीप( भैय्या) पाटील, मा.उपसभापती, सुरेंद्र (काका) तपसे, दादासाहेब ससाणे,भाजपा माजी जिल्हा चिटणीस दत्ता (भाऊ )धस, दलित आघाडीचे शेषेराव कसबे, जिल्हा अपंग आघाडीचे धनंजय घोळवे, युवा मोर्चाचे मा.अध्यक्ष दत्ता इंगळे, शिवाजी पाटील,सुनील घोळवे,संतोष जाधव, विक्रम डोईफोडे, सोनू सावंत,कमलाकर सोनवणे,दादासाहेब कऱ्हाड, महादेव कऱ्हाड,धनराज लाटे,शैलेश शिंदे, रामकृष्ण भांडवलकर प्रसिद्ध प्रमुख ईश्वर बिक्कड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.