• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने आयोजीत ‘केजचा राजा’ या गावरान आंबा स्पर्धा बक्षीस वितरण शहरातील विश्रामगृह येथे संपन्न

ByND NEWS INIDIA

Jun 23, 2021

केज तालुका प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 ND NEWS:- केज तालुक्यातील सर्वात गोड व चवदार आंब्याच्या गावरान प्रजाती जपल्या जाव्यात याकरिता रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने केजचा राजा या नावाने सर्वोत्कृष्ट गोड व चवदार आंब्याची निवड करण्यासाठी गावरान आंबा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यातील प्रत्येक गावातून किमान एक प्रवेशिका अपेक्षित होती मात्र कोरोना महामारी व लॉकडाऊनची अडचण असल्यामुळे हवा तो प्रतिसाद मिळाला नाही. असे असतानादेखील एकूण 13 प्रवेशिका या स्पर्धेसाठी दाखल झाल्या होत्या.

या स्पर्धेत आंब्याचा आकार, सुगंध व रसदारपणा, गोडी आणि चवदारपणा इत्यादीद्वारे गुणांकन करण्यात आले. या स्पर्धेत अंतिम गुण तालिकेनुसार पुढील प्रमाणे मानांकन मिळाले आहे. या स्पर्धेत डॉ उमाकांत रावसाहेब मुंडे (9423715121, 9422604904)व गणेश भास्करराव धस (9309139696) यांच्या आंब्याला प्रथम क्रमांक (रुपये 1500 विभागून) विभागून देण्यात आले.. तर सीता प्रदीपराव बनसोड (9665333305) व शिवाजी हरिभाऊ ईखे (9579903060) यांच्या वनराज या आंब्याना दुसऱ्या क्रमांकाचे (रु 1000 विभागून) बक्षीस देण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकाचे (रु 500) बक्षीस विजय पुरुषोत्तम जॅकेटिया ( 0942224445)यांच्या आंब्याला देण्यात आले. या स्पर्धेत हिरकन विश्वास गायकवाड (9604218192) व सौ सुचिता रमाकांत डिकले ( 96049 55717) यांच्या आंब्याना (रु 251 ) विशेष प्रोत्साहन पारितोषिके देण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रोटरी क्लब ऑफ केज चे अध्यक्ष रो हनुमंत भोसले, सचिव रो धनराज पुरी, माजी अध्यक्ष रो अरुण अंजाण, भावी अध्यक्ष रो बापूराव सिंगण व सदस्य रो भीमराव लोखंडे यांनी काम केले. विजेत्या आंबा मालकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
पुढील वर्षी 25 मे ते 15 जून या काळात केज शहरात प्रत्यक्ष भव्य गावरान आंबा प्रदर्शन भरवण्याचे रोटरी ने ठरवले आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण 22 जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आले.
स्पर्धकांच्या वतीने डॉ उमाकांत मुंडे, गणेश धस, शिवाजी ईखे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी स्पर्धकांनी रोटरी क्लब ऑफ केजच्या या स्पर्धेमुळे विजेत्या आंब्याना बाजारात चांगला भाव व मागणी राहीली असल्याचे सांगत रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी माजी अध्यक्ष सीता बनसोड, पुढील अध्यक्ष बापूराव सिंगण व सचिव धनराज पुरी यांनी शुभेच्छा मनोगते व्यक्त केली तर माजी अध्यक्ष अरुण अंजान यांनी उपस्थितांचे आभार मानले.