• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अजहर खान:परळी वै.( प्रतिनिधी)

दि. 28.05.2021: जिल्ह्यात असलेले रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन ब्लड डायरी परळी ने जमाअत-ए- ईस्लामी हिंद कार्यालय आझादनगर परळी वैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास जमाते इस्लामी हिंद जिल्हा अध्यक्ष सय्यद इफ्तिखार साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबिरास तरूण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ब्लड डायरी परळी, एसआयओ,जमात ए इस्लामी हिंद परळी, नय्यर ग्रुप ,खिदमत फाऊंडेशन , हजरत उमर फारुख ग्रुप, AK बॉईज, स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया परळी, टिपू सुलतान युवा मंच परळी, एम पी जे परळी. या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आला. सामान्य जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. लसीकरणा बाबत जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती याप्रसंगी बोलताना सय्यद अनवर अध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंदी परळी यांनी दिली. आपल्या संदेशात पवित्र कुरआन चा दाखला देत ते म्हणाले,”तुम्ही एका मानवाला वाचवले, तर तुम्हाला संपुर्ण मानवजातीला वाचवल्याचे पुण्य लाभते.” स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय अंबाजोगाई यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभुमीवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आला आहे अशा भावना आयोजकांनी या वेळी व्यक्त केल्या. यावेळी परळीतील नागरीक, कर्मचारी, तरुणवर्ग व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत दुपारी 4 वाजेपर्यंत एकुण 50 युनिट रक्त संकलन करण्यात आले; वृत्तांता नंतरही रक्तदान सुरूच होते.

या शिबिरास जमात ए इस्लामी हिंद परळी अध्यक्ष सय्यद अन्वर, नगरसेवक केशव गायकवाड , आचार्य सहाब पोलीस स्टेशन संभाजीनगर ,शेख अश्फाक नय्यर ग्रुप, शेख जहीर खिदमत-ए-खल्क फाउंडेशन,एमपीजे जिल्हाध्यक्ष सय्यद सबाहत अली, एसआयओ परळीचे अध्यक्ष जुनैद शेख, शाहरुख खान, सय्यद उमेर, शेख मुदस्सिर, शेख मिन्हाजुद्दीन ,सय्यद अब्बास, राजा खान, तोहिद शेख, फेरोज जनाब,नेहाल खुरेशी, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत उपस्थित होते.