• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

खा. प्रीतमताई यांच्या अथक प्रयत्नातून SRT ला मिळाले 25 व्हेन्टीलेटर

ByND NEWS INIDIA

May 8, 2021

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

ND NEWS |अंबाजोगाई- दि.०८-बीड जिल्ह्यात करोना संकटाने शहरासह ग्रामीण भागाला चांगलेच वेढले असून आशा परस्थीतीत शक्य तेवढे प्रयत्न करून सामान्य जनतेच्या जिवाच रक्षण करण्यासाठी खासदार डॉ प्रितमताई मुंडे विशेष प्रयत्न करत आहेत . केंद्रिय अरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे मागणी केल्या मुळे येथील SRT रुग्णालयासाठी पंतप्रधान केअर फंडातून 25 व्हेन्टीलेटर मिळाले . या उपलब्धी मुळे केजच्या आ . सौ नमिताताई मुंदडा यांनी खासदारांचे आभार मानले .

बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम ताई यांचं करोना पार्श्वभूमीवर संपूर्ण लक्ष जिल्ह्यावर आहे . मागच्या दहा दिवसापासून स्वतः पॉझिटिव्ह असल्या तरी वेगवेगळ्या प्रश्नावर सतत जनतेच्या थेट संपर्कात आहेत . बारा दिवसांपूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यात सर्व कोवीड सेंटरला भेटी देऊन पाहणी केली होती . जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही भेट देऊन रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला होता . तदनंतर ज्येष्ठ भगिनी पंकजाताई च्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात रुग्णालय सुरू करून अन्नदान सेवा यज्ञ सुरू केला आहे . सांगायचं तात्पर्य म्हणजे आजारी असताना सर्व छोट्या-मोठ्या प्रश्नावर त्यांचं लक्ष्य आहे . अंबाजोगाईच्या रूग्णालयात व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना दूरध्वनीवर संपर्क करून या प्रश्नाची मागणी केली . मिळत असलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास पंतप्रधान फंडातून 25 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत . सर्व सामान्य रुग्णांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी यावेळी त्याची फार मोठी उपलब्धी म्हणावी त्या साधनाचा वापर रुग्णालयात सुरु झाला आहे .