• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी

ND NEWS INDIA

बीड प्रतिनिधी

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी यासाठी मा. सुनील गव्हाणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री  यांना निवेदन देण्यात आले. covid-19  महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉक डाऊन असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा फार्म भरण्याचे बाकी आहेत.  दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली आहे. परंतु कोरोना काळात काही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले असुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन त्यांना परीक्षा फार्म भरण्यास वाढीव मुदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सादिक शेख यांच्या वतीने करण्यात आली आहे.