• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*वणीत झुलेलाल मार्केट वर डिबी पथकांची धडाकेबाज कारवाई ,४८ हजाराचा सुगंधित तंबाखू ,सुपारी सह एका आरोपीस अटक*

ByND NEWS INIDIA

May 8, 2021

वणी:- विशाल ठोबंरे

 

महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंखाखू, सुगंधी सुपारीची विक्री करण्यावर कायदेशीर बंदी असली तरी वणीत छुप्या मार्गाने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे सततच्या कारवाईवरुन उघडकीस येत आहेत. अशीच एक कारवाई येथिल डी.बी पथकाने गुरुवारी दि.६ मे रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान जुने बस स्थानक परिसरातील झुलेलाल मार्केट छापा टाकून ४८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपी श्रीधर बसकराम फेरवानी यांचेविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की , दि.६ मे रोजी सकाळी डिबी पथक अधिकारी व कर्मचारी, पेट्रोलींग करीत असतांना खबरे कडुन खबर मिळाली की, सिंधी कॉलनीतील श्रीधर बसकराम फेरवानी हे त्यांचे झुलेलाल मार्केट नगर पालिकेच्या गाळा क्र.२८ येथिल दुकानात सुगंधित तंबाखू व सुपारीचा साठा बाळगुन असल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहिती वरून डीबी पथक प्रमुख पिएसआय/ गोपाल जाधव व त्यांचे पथकाने सदर दुकानावर छापा टाकला असता आरोपी

श्रीधर बसकराम फेरवानी यांचे ताब्यात मजा, १०८ हुक्का शिशा तंबाखू,रितीक सुगंधित सुपारी,अन्नी गोल्ड स्विट सुपारी,विमल पान मसाला,सुगंधित तंबाखू असे एकुण ४८हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने करवाई करिता अन्न व औषध प्रशासन विभाग यवतमाळ यांचेसह संयुक्त करवाई करुन श्रीधर बसकराम फेरवानी यांचेविरुद्ध कलम १८८, ३२८, २७२, २७३, २६९, २७०, भा.दंं.वि.सह अन्न सुरक्षा मनके कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६(२)कलम २७,कलम २३ सहकलम ३०(२)(v)अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपी श्रीधर बसकराम फेरवानी यास अटक करुन आज दि.७ मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने न्यायलयीन कोठडी सुनावली.

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूज़्ज़लवार, पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, रत्नपाल मोहाडे,हरिन्द्र भआरती, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी केली.