• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कोरोना लसीच्या नोंदणी प्रक्रियेत बदल करून लसीकरण केंद्र वाढवावेत – आ.नमिता मुंदडा यांची मागणी

ByND NEWS INIDIA

May 7, 2021

 

केज प्रतिनिधी:-हनुमंत गव्हाणे

ND NEWS:

बीड जिल्ह्यात कोरोना लसीसाठी ऑनलाईन नोंदणी करून ही अनेकांची नावे लस घेण्यासाठीच्या यादीत येत नाहीत. रांगेत ताटकळत उभे राहिल्यानंतर प्रत्यक्ष लस घेण्यासाठी जेंव्हा व्यक्ती केंद्रावर जातो तेंव्हा त्यांना यादीत नाव नसल्याने पुन्हा नोंदणी करा असे सांगून परत पाठवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी सदर लसीच्या नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी दूर करून लसीच्या केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी लसीकरण केंद्र वाढवावेत अशी मागणी केज विधानसभेच्या आ.नमिता मुंदडा यांनी आज दि.०७ मे शुक्रवार रोजी मा.आयुक्त (महसूल), मराठवाडा विभाग व मा.जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.