• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ना. धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सेवाधर्म –

ByND NEWS INIDIA

May 6, 2021

सारं काही समष्टीसाठी’ उपक्रम; शुक्रवारपासून होणार सुरुवात

ND NEWS: सौम्य लक्षणे असलेल्या महिलांसाठी 100 खाटांचे विलगिकरण केंद्र, कोरोनाबाधित परिवारातील सदस्यांच्या विवाहासाठी 10 हजार रुपये मदतनिधी

  • लसीकरण नोंदणी कक्ष, लसीकरण केंद्रावर ने-आण करण्यासाठी मोफत बससेवा
  • कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांना मिळणार मोफत कोरोना सुरक्षा किट

अजहर खान :परळी 

:परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीकरांसाठी ‘सेवाधर्म – सारं काही समष्टीसाठी’ (समाज हितासाठी) हा अभिनव उपक्रम येत्या शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत सौम्य लक्षणे असलेल्या महिलांसाठी परळीत 100 खाटांच्या स्वतंत्र आयसोलेशन सेंटरची सुरुवात करण्यात येणार असून, याठिकाणी सर्व सुविधा मोफत उपलब्ध असणार आहेत.

बाधित कुटुंबाला मदत

 

त्याचबरोबर कोरोनाबाधित असलेल्या परळीतील गरीब व गरजू कुटुंबातील सदस्यांच्या विवाहकार्यासाठी 10 हजार रुपये मदतनिधी देण्यात येणार आहे.

मोफत सिटी बस

या उपक्रमांतर्गत परळीतील नागरिकांना लसिकरण केंद्रपर्यंत जाणे येणे साठी मोफत सिटी बस सेवा देखील सुरू करण्यात येत आहे.

कोरोनाबाधित रुग्ण व कुटुंबियांना कोरोना सुरक्षा किट चे वितरण करण्यात येईल, या मध्ये शरीरातील ऑक्सीजन पातळी मोजण्याकरीता पल्स ऑक्सी मिटर, सॅनिटायझर बॉटल्स, मास्क्स, साबण व इतर उपयोगी वस्तूंचा समावेश असेल.

 

सहाय्यता कक्ष

सेवाधर्म अंतर्गत शहरात राष्ट्रवादी आधार केंद्र सुरु करून याद्वारे ऑनलाइन लसीकरण नोंदणी, वैद्यकीय सहाय्यता, मोफत भोजन व्यवस्था, मोफत वाहतूक व्यवस्था, रक्त पेढी समन्वय, कोरोना चाचणी मदत,यासह विलगीकरण कक्ष मध्ये प्रवेश मिळण्यासाठी सहाय्यता करण्यात येईल.

परळीतील सर्व दवाखान्यातील आरोग्यसेवकांना स्टीलचा टिफिन प्रोत्साहनपर स्वरुपात भेट देण्याचेही नियोजन करण्यात येत आहे.

करोना योद्धयांना विमा

त्याचबरोबर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना प्रादुर्भावात कार्य करणाऱ्या कोरोना योध्दयांचे विमा पॉलिसीने संरक्षण करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

नगर परिषदेच्या शहर निर्जन्तुकीकरण मोहिमेला अधिक बळकट करण्यासाठी फवारणी यंत्राचे लोकार्पण करून जिथे मागणी तिथे तात्काळ फवारणी करण्यात येईल.

उन्हाचा वाढलेला पारा लक्षात घेऊन शहरातील सर्व लसिकरण केंद्र, कोविड सेंटर, विलगीकरण केंद्र, चाचणी केंद्र आदि ठिकाणी मंडप व आसन व्यवस्था करुन निवारा केंद्र उभी केली जाणार आहेत.

त्याचबरोबर जास्तीत जास्त लसीकरण व्हावे या हेतुने लसीकरण करण्यासाठी व्यापक जनजागृति मोहिमेस सुरुवात करण्यात येईल.

या सेवाधर्म उपक्रमाची सुरुवात शुक्रवार पासून करण्यात येणार असून, कोरोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत हा उपक्रम सुरू राहील, यासाठी नगर परिषद गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक, विविध आघाड़याचे पदाधिकारी जय्यत तयारी करत असून जास्तीत जास्त नागरिकांना सेवाधर्म या अभिनव उपक्रमातून आधार मिळावा हा संकल्प केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ , शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी दिली आहे .