• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*_कोव्हीड रूग्णांसाठी परळीत मार्गदर्शन व मदत साठी हेल्प-लाईन नंबर सुरू_* 

ByND NEWS INIDIA

May 6, 2021

*अझहर खान :परळी*

 

ND NEWS

एस.आय.ओ परळी, व जमात-ए-इस्लामी हिंद, परळी यांच्या संयुक्तविद्यमाने दिनांक 4 मे रोजी परळीत कोव्हीड रूग्णांसाठी मदत व मार्गदर्शन साठी हेल्प-लाईन चा मुफ्ती सय्यद अश्फाक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या केंद्राशी संपर्क साधण्यासाठी कोव्हीड टास्क फोर्स हेल्पलाइन नंबरचे

+91-8446171797 उद्घाटन यावेळी करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून कोव्हीड रूग्णांना चोवीस तास वैद्यकीय मार्गदर्शन, गरजू रूग्णांणा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल अशी माहिती यावेळी हेल्पलाईन सेंटरच्या वतीने देण्यात आली.

माहीती अभावी अशिक्षित रूग्ण भांबावून जात असल्याने हे सेंटर सुरू करण्यात आले असेही यावेळी संघटनेकडून सांगण्यात आले. या सेंटरवर महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी चोविस तास सेवा देणार आहेत.

 

कोरोणाचा उपचार, विविध तपासण्या, डॉक्टरांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांकडूनच गरजू रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना या सेंटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा मानसिक आधार मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

 

एस.आय.ओ. आणि जमात-ए-इस्लामी हिंद देशपातळीवर या हेल्पलाईन केंद्र निर्माण करून गरजूंना मदत करत आहेत. याप्रसंगी जमात-ए-इस्लामी हिंद परळीचे अध्यक्ष सय्यद अन्वर सर , बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद इफ्तेखार सर, एस.आय.ओ परळी शहर अध्यक्ष शेख जुनैद,मोईन फारूकी , सय्यद उमर, शेख मुदस्सर ,शाहरुख खान, सय्यद एहतेशाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.