• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जिल्ह्यात कडक लॉकडाउन ! आणी पोलीस योध्यानीं केला काऊंटडाउन सुरू!

ByND NEWS INIDIA

May 4, 2021

 

विशेष वृत्तांकन

 

बीड: जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आत्ता प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून बुधवार ते शुक्रवार पर्यंत तीन दिवस मेडिकल वगळता किराणासहित सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत तसेच शनिवार आणि रविवार या दोनच दिवशी सायंकाळी ५ ते ७ यावेळत फिरून फळ विक्री करता येणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यापासून लॉकडाऊनची परिस्थिती आहे मात्र तरीदेखील रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी दोनशे-तीनशे, ५०० वरून संख्या थेट आता दीड हजार रुग्ण संख्यापर्यंत पोहनचली आहे. लोकविनाकारण रस्त्यावर गर्दी करत आहेत विना मास्क रस्त्यावर फिरत आहेत अशी परिस्थिती राहिली तर आठवड्यातील इतर जिल्ह्यांची संख्या कमी होईल आणि बीड मात्र सगळ्या पुढे जाईल, लोकांना आटोक्यात आणण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यासाठी आहोरात्र परिश्रम घेणारे खरेयोद्धे म्हणजेच डॉक्टर, पोलीस यंत्रणा, मीडिया,आणि यांशी संबंधित सर्व यंत्रणा ,यामध्ये सेवकांपासून,ते सफाई कामगारांपर्यंत ते आपल्या माध्यमातून सेवा पोहनचवणारे वाहतूक कर्मचारीही सर्वच योद्धे यामध्ये आपले कर्तव्ये जिद्दीने पार पाडत आहेत.

स्वतःची पर्वा न करता या परिस्थितीत कार्य करत आहेत. त्याचबरोबर

बीड जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्णसंख्या पाहून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीदेखील सुद्धा चिंता व्यक्त केली आहे.त्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी याबाबत आता अधिक कडक धोरण अवलंबले आहे मध्यंतरी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या तीन-चार बैठकीत रस्त्यावर फिरनाऱ्या लोकांची गई करू नका बाहेरून शटर बंद आणि आतून सगळे सुरू अशी परिस्थिती जिल्ह्यात असल्याचे सांगत असा मिळमिळ लॉकडाउन नको कडक लॉकडाऊन करा असे सुचवले होते. त्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची अँटीजन टेस्ट देखील जागेवरच सुरू केले होती. तरीदेखील रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही हे लक्षात आल्यानंतर बुधवार म्हणजे पाच मे ते शुक्रवार सात मे पर्यंत तीन दिवस वैद्यकीय क्षेत्र वगळता इतर सर्व किराणा सहित आस्थापना तीन दिवस कडेकोट बंद राहणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अथवा दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागेल. असेही म्हटले आहे. दूधवितरण सकाळी सात ते अकरा या वेळेत होईल, तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत फळ विक्री ही कॉलनी-कॉलनी मध्ये फिरून करता येईल असेही या आदेशात म्हटले आहे.या नव्या नियमामुळे रुग्ण संख्या कमी झाली तर आरोग्य व्यवस्थेवरील तान निश्चितपणे कमी होईल. नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जगताप यांनी केले आहे.