• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गेवराईत कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले !

ByND NEWS INIDIA

Apr 24, 2021

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले 

ND NEWS : — कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण केले आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस फैलाव होत असून रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. बेडची कमतरता, आॅक्सीजनची सुविधा, रक्त पुरवठा, विविध इंजेक्शनची उपलब्धता, प्लाज्मा अशा अनेक सुविधांची माहिती सामान्य माणसाला नसते आणि कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट येताच पेशंट व नातेवाईक घाबरून जातात. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करायला या आजाराच्या दहशतीमुळे कुणीही पुढे येत नाही आणि प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही वाढत आहे. पर्यायाने रुग्णांचे हाल होत आहेत.
या सर्व परिस्थितीचे भान ठेवून गेवराई शहरातील सर्व स्तरातील व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोरोना रुग्ण सेवा समिती स्थापन केली आहे. यात सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, युवक एकत्रित येवून कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी व प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. अॅड. सुभाष निकम, संजय काळे, डॉ. अनिल दाभाडे, प्रा. राजेंद्र बरकसे, बाळासाहेब सानप, कडूदास कांबळे, दादासाहेब घोडके, अमोल वैद्य, राजेंद्र आतकरे, अॅड. कमलाकर देशमुख, अॅड. श्रीनिवास बेद्रे, सय्यद एजाज, नईम आत्तार, डॉ. मनोज मडकर, डॉ. ओमप्रकाश भुतडा, डॉ.बी.आर.मोटे, डॉ.आबेद जमादार, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. भगवान आतकरे, डॉ.प्रवीण सराफ, अखीलसेठ, वसीम फारोकी, अय्यूब बागवान, महेश बेदरे, कृष्णा मुळे, सचीन मोटे, अक्षय पवार, राम मोटे, संदीप मडके, प्रा.पी.टी.चव्हाण, विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी – सुनील पोपळे, मधूकर तौर, अंकुश आतकरे, विनोद नरसाळे, सुभाष मुळे, सुभाष सुतार, भागवत जाधव, गोपाल चव्हाण, बापूसाहेब हुंबरे, सोमनाथ मोटे, सुशील टकले, शेख जावेद, अमोल कापसे, व्यापारी प्रताप खरात, बाळासाहेब बर्गे, जयराज कौराणी, सुरेंद्र रूकर, हरीश मंघारामाणी,उमेश बजाज, अमित शिखरे, प्रशांत गोलेच्छा, प्रभाकर घोडके, प्रशांत घोटणकर, शंकर सूर्यवंशी, रखमाजी चौधरी, संजय पाडूळे, शिरीष भोसले, मनोज हजारे, अभिजित काला, रंजीत सराटे, रामप्रसाद गाढे इत्यादी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.
कोरोना रुग्ण सेवा समितीच्या प्रतिनिधी मंडळाने शारीरिक अंतराचे पालन करून गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासन आणि रुग्ण यांच्यातील सर्व स्तरांवर रुग्णसेवा करण्याचा उद्देश कळविला आहे.
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून तनमनधनाने यात कार्य करू इच्छिणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या समितीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कोरोना रुग्ण सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.